पाकिस्तान मध्ये दहशतवादी संघटना दिवसेंदिवस अधिकच मजबूत होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तेथील सामाजिक अस्थिरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पाकिस्तान सरकारवर नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा व त्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात येतो. आणि हे सत्यच आहे. सबंध पाकिस्तानात सध्या दहशतवादी संघटनेंचे साम्राज्य आहे. याला तेथील सरकारच जबाबदार आहे. नुकताच पाकमध्ये सत्ता बदल झाला आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यांचा अनेक दहशतवादी संघटनेंशी संबंध असल्याचे दिसून येते. निवडणूकपूर्व कालावधीत इम्रान खान यांनी तालिबान या दहशतवादी संघटनेचे उघडपणे समर्थन केले होते. त्याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येऊ शकतात. दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी करणारा नेता दहशतवादी संघटनांवर कारवाईची पावले उचलली का, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. गेल्या सहा दशकापासून भारत पाक यांमध्ये काश्मिरच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे.याची सुरूवात १९४७पासून झाली.तेव्हापासून पाक वारंवार दहशतवादी हल्ले करत आहे. हे प्रकरणावर तोडगा निघावा म्हणून १९४८ दरम्यान भारत युनायटेड नेशन्सल...
Posts
पेट्रोल दरवाढ
- Get link
- X
- Other Apps
सध्या भारतात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. दिवसाला ५०-६० पैशाची दरवाढ होऊन पेट्रोलने आता नव्वदी पार केलीये. अजून तीन ते चार महिने दरवाढ अशीच राहणार आहे. सध्या कच्च्या तेलाच्या बॅरल दर .जागतिक बाजारपेठेत जवळपास ८०डाॅलरवर पोहोचला आहे.इराण, सौदी अरेबिया,रशिया हे कच्च्या तेलाचे मोठे उत्पादक आहेत मध्यंतरी अरब या देशांने कच्चा तेलाच्या बॅरलचे उत्पादन जवळपास २,००,००० बॅरल ने घटवले. अमेरिकेने इराणवर लादलेले व्यापारी निर्बंध कारणे, कच्च्या तेलाचे घटते उत्पादन आणि त्यामुळे झालेली कच्चा तेलाची दरवाढ,ही कारणे पेट्रोल, डिझेल दरवा़ढीला कारणीभूत आहेत.इरा़णवर लादलेल्या व्यापारी निर्बंधामुळे अनेक देश चिंतीत आहेत.या व्यापारी निर्बंधामु़ळे दर भविष्यात शंभरी ओलांडू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. कच्च्या तेलाला भारतातून सर्वाधिक मागणी असते यामुळे दरवाढीची भारतातील सामान्य नागरिकांना अधिक झळ बसण्याची शक्यता आहे. एका बॅरेलमध्ये साधारण १५९ लिटर कच्चे तेल असते. जेव्हा कच्चे तेल देशात येते तेव्हा सुरूवातीला त्याचे रिफायनिंग केले जाते. रिफायनिंगचे दर, कच्च्या तेलाचे आयात कर, पुन्...