छत्रपती संभाजी महाराजांची कुंडली

🌼संभाजी महाराजांची कुंडली 🌼

बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उमजला आहे. साक्षात रूद्र जन्माला आला आहे! रूद्र हिमालयात राहतो तसाच हा उंच गडकोटांवर राहील. कुळाची किर्ती उंच करेन. रुद्रासारखाच प्रलय-तांडव मांडेल! याचा भोळाभाबडा, तापट आणि सरळ साधा  स्वभाव असेल. रूद्राला नसते तशी यांना मृत्यूची पर्वा असणार नाही. आणि- नंतर हरभट क्षणभर थबकतात. जिजाऊ म्हणतात, "आणि काय शास्ञी?.. तर हरभट म्हणतात"

पुराणांतरी अनेक प्रसंगी रूद्र आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसुन येतो "

हरभटांनी कुंडली सांगितल्यावर सर्वच जण शांत झाले होते. "पुराणांतरी अनेक प्रसंगी रूद्र आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसुन येतो.  जिजाबाईंनी 'असं काय आम्हीदेखील फसलोच की!" असे म्हणून  सर्वांवरील ताण कमी केला.

महाराज देखील म्हणाले, " रुद्राचे सारे गुण घेऊन आलात तसेच कोणतेही विष पचविण्याची ताकदही घेऊन आला असाल!     [ संदर्भ - : छावा - शिवाजी सावंत पान नं. 14 ]

महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे शंभूराजे  सर्व परिस्थितींना तोंड देण्याची, संकटांवर मात करण्याची ताकद अंगी घेऊन आले होते. कधीही कोणत्याही परिस्थितीसमोर झुकले नाहीत. अगदी मृत्यूलादेखील सामोरे गेले. मुघल, फ्रेंच, डच, पोर्तुगीज स्वराज्याच्या दिशेने चालून येत होते अशा परिस्थितीत शंभूराजे चवताळलेल्या वाघाप्रमाणे शञूवर तुटून पडून त्यांचा फडशा पाडत होते . कोठून येत असेल यांच्यात एवढे धैर्य आणि साहस !  त्याला एकच उत्तर आहे जिजाऊ साहेबांचा आशिर्वाद आणि महाराजांचा आशिर्वाद. शेवटी एका पराक्रमी राजाचा पुञ म्हणल्यावर धैर्य, धाडस, सुख, दुःख पचविण्याची ताकद घेऊनच त्याने जन्म घेतला असावा. अशा पराक्रमी योद्धांचा इतिहास चाळताना डोळ्यापुढे रोमांच उभे राहतात, अंगावर शहारे येतात. सांसारिक सुख दुःखे बाजुला ठेवुन स्वराज्यासाठी लढणार्‍या आपल्या प्राणाची पर्वा न स्वराज्यासाठी लढणार्‍या या स्वराज्याच्या धाकल्या धनींना मानाचा मुजरा !!!! धन्य तो स्वराज्याचा छावा 🙏जय शंभूराजे जय शिवराय

📝 कुणाल चव्हाण
       सातारा

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचा मृत्यू की खून?