पाकिस्तान मध्ये दहशतवादी संघटना दिवसेंदिवस अधिकच मजबूत होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तेथील सामाजिक अस्थिरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पाकिस्तान सरकारवर नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा व त्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात येतो. आणि हे सत्यच आहे. सबंध पाकिस्तानात सध्या दहशतवादी संघटनेंचे साम्राज्य आहे. याला तेथील सरकारच जबाबदार आहे.
नुकताच पाकमध्ये सत्ता बदल झाला आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यांचा अनेक दहशतवादी संघटनेंशी संबंध असल्याचे दिसून येते. निवडणूकपूर्व कालावधीत इम्रान खान यांनी तालिबान या दहशतवादी संघटनेचे उघडपणे समर्थन केले होते. त्याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येऊ शकतात. दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी करणारा नेता दहशतवादी संघटनांवर कारवाईची पावले उचलली का, याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
गेल्या सहा दशकापासून भारत पाक यांमध्ये काश्मिरच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे.याची सुरूवात १९४७पासून झाली.तेव्हापासून पाक वारंवार दहशतवादी हल्ले करत आहे. हे प्रकरणावर तोडगा निघावा म्हणून १९४८ दरम्यान भारत युनायटेड नेशन्सला गेला. युनायटेड नेशन्सने पाच लोकांची समिती नेमून काश्मीर प्रांताची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या ठरावात दोन्ही देशांवर काही शर्ती लादण्यात आल्या. एका शर्तीमध्ये पाकिस्तानने आपले सैन्य काश्मीर वरून हटवावे, असे लिहिले होते.परंतु पाकिस्तानने आपल्या दहशतवादी कुरघोड्या सुरूच ठेवल्या.पंतप्रधानपदी इमरान खान विराजमान झाल्यावर ते म्हणाले होते, 'भारताने दोन्ही देशात शांतता प्रस्थापित रहावी म्हणून एक पाऊल टाकले तर आम्ही पुढे दोन पाऊल टाकू "यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक चर्चेसाठी भारत नेहमीच तयार असेल, असे म्हणून चर्चेसाठी तयारी दर्शविली होती. परंतु असे म्हणूनही दहशतवादी हल्ले सुरूच आहेत.दरम्यान आम सभेच्या निमित्ताने दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा होईल असे वाटले होते पण त्याच दरम्यान पाकिस्तान सैन्याने एका भारतीय सैनिकाची गळा चिरून हत्या केली. काश्मीर पोलीसांवर हल्ले केले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भारताने चर्चेला नकार दिला.
सध्या पाकिस्तान सामाजिक अस्थिरता, दहशतवाद, आर्थिक संकटे, आदि नी ग्रासला आहे. सध्या चीन पाकिस्तानला मदत करत असली तरी डोक्यावर कर्जांचा मोठा डोंगर असलेला पाकिस्तान भविष्यात चीनकडून आर्थिक मदत घेईल का, याबाबत संभ्रम आहे. मध्यंतरी अमेरिकेनीही वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या रकमेत कपात केली होती. त्यामुळे इमरान खान यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.क्रिकेटमध्ये रणनिती आखून विरोधी संघाचे पानीपत करणार्या या व्यक्तीची देशाचे नेतृत्व करताना खरी कसोटी लागणार आहे. क्रिकेटच्या मैदानात आपल्या अनोख्या शैलीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करणारा हा खेळाडू, देशाचे नेतृत्व करताना देशाला नवी दिशा प्राप्त करून देणार की, स्वतः क्लिन बोल्ड होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
📝कुणाल चव्हाण
सातारा

छान..... असेच लेख लिहीत जा👍
ReplyDelete