शिवाजी महाराजांचा मृत्यू की खून?

🌼शिवाजी महाराजांचा मृत्यू की खून? 🌼

👉शिवाजी महाराजांचा मृत्यू  हा विषय आपणासर्वांना भावनिक करुन टाकणारा विषय आहे. 3 एप्रिल 1680 रोजी रयतेच्या या राजाने देह ठेवला आणि ते अनंतात विलीन झाले. महाराजांच्या मृत्यूविषयी चर्चा करणे हा एक खर्च गंभीर विषय आहे पण यावर चर्चा करणे गरजेचे आहे. काहींच्या मनात महाराजांचा मृत्यू यांबद्दल बरेच संभ्रम आहे. यावरच आपण चर्चा करणार आहोत. महाराजांचा मृत्यू झाला 1680 मध्ये पण महाराजांच्या मृत्यूच्या चार वर्षे आधीपासूनच म्हणजे साधारण जानेवारी 1676 पासुनच महाराजांचे निधन झाल्याचे अफवा पसरत होत्या. इंग्रजांची पञे चाळली असता तुमच्या लक्षात येऊ शकते. हा विषय खूप मोठा आहे. महाराजांच्या मृत्यूसंबंधी अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात की महाराजांचा खून झाला की मृत्यू?  याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

1) ब्रिटिश नोंदी पाहिल्या असता आपल्याला समजेल की जानेवारी 1676 पासुनच महाराजांच्या मृत्यूसंबंधी अफवा पसरल्या जात होत्या.

2)ब्रिटिश पञव्यवहारमधील 17 जानेवारी 1676 ची नोंद पाहिली असता तिथे "it was reported he was poisoned by his son, his son being informed his father had commanded the watch of rairee castle to throw him down over wall"  असा उल्लेख दिसतो. म्हणजेच शिवबापुञाने विषबाधेने त्यांना ठार केले. महाराजांना सांगितले की रायरी किल्ला पाहायला जा जेणेकरून त्यांना कड्यावरून ढकलता येईल.

👉जानेवारी 1676 स्वॅली मरिनच्या पञाच्या शेवटी देखील. here is a flying report that sevagee is dead  असा उल्लेख आहे.

👉27 जानेवारी 1676 च्या पञात देखील उल्लेख आहे की मिळालेले अहवाल वेगवेगळे आहेत काही मृत्यूचे तर काही तर आजारपणाचे तर काही महाराज पूर्णतः बरे झाल्याचे त्यामुळे शक्यता नाही

👉13 मार्च 1676 च्या पञात "sevagee rajah is very well at purnollah" बहुतेक महाराजांच्या स्वारी, आक्रमणे वगैरे यावरून त्यांना  कळले असावे.

👉7 एप्रिल 1676 च्या पञात देखील उल्लेख आहे की "he Was poisoned by his Barbar and for a long time hath not appeared abroad" म्हणजे महाराजांना त्यांच्या न्हाव्याने विषबाधा केली त्यानंतर काही काळ महाराज बाहेर कोठे दिसले नाहीत.

👉यादरम्यानच्या काही पत्रात महाराजांच्या मृत्यूसंबंधी अनेक शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत. सतराव्या शतकात आजारांवर निदान करण्यासाठी आपल्याकडे फारसे औषधे नव्हती. जे वैद्य होते ते जंगलातील औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींपासून औषध काढा बनवायचे. बरेच औषधोपचार झाले तरी महाराजांचा आजार कमी होत नसल्याने महाराजांनी ब्रिटिशांकडे काही औषधांची मागणी केली. त्यातील मुख्य औषध कॉर्डियल स्टोन. कॉर्डियल स्टोनबद्दल माहिती मिळवली असता लक्षात आले की, अगदी प्राचीन काळापासून कॉर्डियल स्टोन उपचारासाठी प्रसिद्ध होता. तो एक ग्रीक आणि अरेबियन औषधपद्धतीचा भाग होता. सोळाव्या सतराव्या शतकाच्या दरम्यान पोर्तुगालमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. याचा वापर ह्रदय विकार, ताप, प्लेग रोग, आदि आजारांवर होत असे. महाराजांनी मागवलेल्या औषधाची यादी 14 मे 1677 च्या पञात उपलब्ध आहे .

🌼 अण्णाजी दत्तो, मोरोपंत आदि. मंत्र्यांनी वा सोयराबाईंनी महाराजांना विषप्रयोग करुन मारले याबाबत तथ्यता - :

👉बॉम्बे टू सुरत या इंग्रजांच्या 3 मे 1680 च्या पञात उल्लेख आहे त्यावरून कळते स्वराज्यातील मंञी मोरोपंत पंडीत, अण्णाजी सुरनीस आणि काही मंञी मागवलेली साधनसामुग्री स्विकारायला पन्हाळागडावर गेले होते.

👉संभाजी - विश्वास पाटील या पुस्तकात देखील उल्लेख आहे की शिवरायांच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण रायगड दुःखाने कालवंडला होता. गडावर अष्टप्रधानांपैकी कोणीही कर्ते माणूस नव्हते. त्यामुळे कान्होजी, राहुजी सोमनाथ व सोयराबाईंनी ही बातमी गुप्त ठेवायचा प्रयत्न केला. मुख्य बाब म्हणजे अण्णाजी दत्तो यावेळी कारवार मोहिमेवर होते. तसेच मोरोपंत नाशिकच्या ञ्यंबकेश्वर भागात होते महाराजांच्या मृत्यूसंबंधी बातमी समजल्यावर ते त्वरीत रायगडावर आले. सेनापती हंबीरराव मोहितेंचा कराडजवळ तळ पडला होता असा उल्लेख आहे.

👉राजाराम महाराजांच्या आज्ञेने कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासदांची बखर यामध्ये देखील उल्लेख केलेला आहे. महाराजांचा ज्वर वाढला. नंतर गडावरील मंञ्यांना बोलावून महाराज म्हणाले तुम्ही चुकूर होऊ नका." हा तो मृत्यूलोकच आहे. यामागे किती उत्पन्न जाले तितके गेले. तुम्ही निर्मळ बुद्धीने सुखरूप असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो" असे महाराजांनी सांगून सर्वांना बाहेर जायला सांगितले. स्नान करून, भस्म कपाळी लावून रुद्राक्ष धारण केले. आणि योगाभ्यास करुन शके 1602 15 रविवारी दोन प्रहरी महाराजांनी देह सोडला.

👉सभासदांची बखर यामध्ये महाराजांना ज्वर झाल्यावर गडावर कोण कोण उपस्थित होते याबद्दल देखील माहिती आहे. गडावर निळोपंत, गंगाधरपंत, रावजी, रामचंद्र नीळकंठ, हिरोजी फर्जंद, सूर्याजी मालुसरे, आदि उपस्थित होते.

👉थोडा पार्श्वभूमीवर प्रकाशझोत टाकला असता समजते की 15 मार्च 1680 ला राजाराम महाराजांचा विवाह प्रतापराव गुजर यांच्या कन्येशी लावण्यात आला. आणि नंतर महाराज रक्तसाराने 3 मार्च 1680 निधन पावले. (प्र.न.देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज)

👉गूगलवरून सर्च केले असता त्यात काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. शिवरायांच्या मृत्यूवेळी महाराजांचे सर्व नातेवाईक पाचाडला होते. तसेच सेनापती हंबीरराव मोहिते तळबीड (कराड) येथे होते. तसेच संभाजी महाराज अॉगस्ट 1680 ला म्हणतात की सोयराबाई या स्फटिकासारख्या' यावरून आपल्या लक्षात येते की सोयराबाई या पूर्णतः निर्दोष होत्या. पण काही मंञ्यांनीच संभाजी महाराजांबद्दल सोयराबाईंच्या मनात वाईट प्रतिमा निर्माण केली.

👉थोडक्यात काय तर महाराजांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर प्रकाशझोत टाकला असता समजते की महाराजांच्या मृत्यूदरम्यान मंञी गडावर नव्हते. तसेच कुटुंबिय पाचाडला होते. त्यामुळे खुन करण्याचा प्रश्नच उमटत नाही.

👉महाराजांच्या मृत्युच्या कारणाविषयी पाहिले असता समजते की बर्याच पुस्तकांमध्ये विविध कारणे दाखवली आहेत. विविध संदर्भ पाहिले असता महाराजांचा खुन झाला नाही हे निष्पन्न होते.

👉महाराजांच्या मृत्यूसंबंधी इंग्रजांचे 28 एप्रिल 1680 चे पञ पाहिले असता त्यात लिहिले आहे we have certaine news that sevagee rajah is dead. It is now 23th days since he deceased it is said of bloody flux. Being sick 12 days.

👉इथे लिहिले आहे की महाराजांना रक्तसार झाला व त्यामुळे त्यांचे निधन झाले. ते 12 दिवसांपासून आजारी होते.

👉काही पुस्तकात मंत्र्यांनी कपट करुन मारले किंवा गुडघेरोगाने मृत्यू झाला ही कारणे तितकीशी पटत नाहीत.

👉बर्याच घटना वाचून लक्षात येते की महाराज बर्‍याच अवधीपासून आजारी होते. जवळपास 1676 पासुन. सततच्या मोहीम, हालचाली, युद्धे यांमुळे महाराज कधीच स्वस्थ नव्हते. सतत मोहिमेवर असायचे. अगदी प्रकृती स्थिर नसतानाही त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम आखली, नंतर जालनास्वारी, गोवळकोंडा मोहीम, कर्नाटक मोहीम यांमुळे महाराजांचा सततचा प्रवास होता.
काहींकडून असेदेखील समजले की महाराजांनी मोहीमेदरम्यान विश्रामगडावर विश्राम केला त्यामुळेच गडाचे पुढे नाव विश्रामगड पडले.
सातारचा अजिंक्यतारा किल्ला विजयपूरांकडून 1675 ला ताब्यात घेतल्यानंतर महाराज 1 डिसेंबर 1676 पासून 25 जानेवारी 1677 पर्यंत अजिंक्यतारा किल्ल्यावर होते. यादरम्यान ते आजारी होते असेही समजते.

👉गुडघेरोगाबद्दल सांगायचे झाल्यास महाराज सतत मोहिमेवर असायचे त्यामुळे सतत ते घोड्यावर व पालखीतून प्रवास करत असावेत. क्वचितच चालणे असल्याने गुडघेरोगाने मृत्यू शंकास्पद वाटतो.

👉दरम्यान सर्व पुराव्यावरून असे लक्षात येते की महाराज प्रदीर्घ काळापासून आजारी होते. आजारी असतानाही त्यांनी मोहीम आखल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली असावी आणि यामुळेच अंगी ज्वर वाढल्याने वा आजाराने महाराज निधन पावले हे समजते.

🙏जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🙏

लेखक - कुणाल चव्हाण
            सातारा

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजी महाराजांची कुंडली